लीलावती पॅलेस चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथे लिलावती पॅलेस चषक 14 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट कोचिंग इन्स्टिटय़ूट संघाने एसजीएम धारवाड संघाचा 9 गडय़ाने पराभव करून 2 गुण मिळविले. शुभम के याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या लीलावती पॅलेस चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत एसडीएम क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 9 बाद 94 धावा केल्या. आयानने 14 सिद्धार्थने 13, ज्युनेद के वसर्जान यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. क्रिकेट कोचिंग इन्स्टिटय़ूटतर्फे शुभम के, राजदीप एम., अवनीश यांनी प्रत्येकी 2 तर मुकेशने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना क्रिकेट कोचिंग इन्स्टिटय़ूट संघाने 16.2 षटकात 1 बाद 95 धावा करून सामना 9 गडय़ाने जिंकला. शुभम के याने 7 चौकारासह नाबाद 42, आदिने 4 चौकारासह नाबाद 29 तर कलशने 10 धावा केल्या. एसडीएमतर्फे आयानने 1 गडी बाद केला.