मुंबई
मागील काही दिवसांपासून क्रिप्टो करन्सी (आभासी चलन)किमती घसरणीत तेजीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये पुन्हा काहीसा बदल होत शुक्रवारपर्यंत गेल्या 24 तासात 17 टक्क्यांची तेजी प्राप्त केली असल्याची माहिती आहे. यामध्ये सर्वाधिक पोलकाडाटची किमत जवळपास 17 टक्क्यांनी वधारुन 31.90 डॉलरवर पोहोचली होती.
आभासी चलनामध्ये लोकप्रिय असणाऱया बिटकॉईन चलनाची किमत ही साधारण 4.60 टक्क्यांनी वधारुन 44,108 डॉलरवर पोहोचली आहे. एथरियमची किमत ही 105 डॉलरवर राहिली असून यामध्ये 8.20 टक्क्यांची वाढ राहिली आहे. कार्डानोची किमत ही 11.26 टक्क्यांनी वधारुन 2.28 डॉलरवर पोहोचली. तेथरची किमत काही प्रमाणात घसरुन 1 डॉलरवर राहिली होती.
बिनांस कॉईनची किमत 7 टक्क्यांनी तेजीत राहिली असून यामध्ये चलन 378 डॉलरवर ट्रेडिंग करत होते. एक्सआरपी 9 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारुन 1 डॉलरवर होते. सोलानाची किमत ही 148 डॉलर राहिली आहे. यामध्ये साधारणपणे 14 टक्क्यांची तेजी राहिली असल्याची नोंद केली आहे.