मार्केट पोलिसांची कारवाई, 18 हजार रुपये जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
खंजर गल्ली येथील एका मटका अड्डय़ावर छापा टाकून चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून या संबंधी एकूण पाच जणांविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
खंजर गल्ली येथे मटका घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून चौघा जणांना अटक केली. त्यांच्याजवळून 18 हजार 700 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. जॉन ऍन्थोनी फर्नांडीस (वय 74, रा. टि. व्ही. सेंटर), नहीम जिलाणी कोतवाल (वय 39, रा. दरबार गल्ली), सुनील लक्ष्मण कोळी (वय 35, रा. मण्णूर), अशोक इराप्पा हंपण्णावर (वय 52, रा. खडेबाजार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या चौघा जणांनी खंजर गल्ली येथील फहीम जिलाणी कोतवाल याला चिठ्ठय़ा पोहोवत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्याच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे