प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने खुनाच्या गुन्हयातील सुटलेल्या एका इसमासह इतर दोन इसमांकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत दोन इसम पांढऱया रंगाची ऍक्टीवा मोटार सायकल (एम एच 11 बी टी 8361) वरुन वाई येथील फुलेनगर मशीदजवळ गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ त्यांचे पोलीस पथकासह मिळाले बातमीच्या ठिकाणी सापळा लावला. त्यामध्ये दोन इसम मोटार सायकलवरुन येताना दिसले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले, त्यांना शिथापिने पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता एका इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्टल व दुसऱया इसमाकडे दोन जिवंत काडतूसे मिळून आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचा अन्य साथीदार शहाबाग फाटा येथे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला देखील तात्काळ पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता संशयीत इसम हा खंडाळा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खुनाच्या गुह्यातील आरोपी असून त्या गुन्हयातून तो सुटलेला आहे. तिन्ही संशयीताना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत राउंड, मोटार सायकल, मोबाईल फोन असा एकुण 1 लाख 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चालू आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, पोलीस हवालदार तानाजी माने, विनोद गायकवाड, बबन पवार, पोलीस नाईक मोहन नाचण, योगेश पोळ, अजित कर्णे, धीरज महाडीक, विशाल पवार, मयुर देशमुख, वैभव सावंत, संजय जाधव यांनी सहभाग घेतला आहे.