ऑनलाईन टीम / राजगुरुनगर :
पुण्यात एका पोलीस पाटीलावर गोळीबार करण्यात आला. ही घटना खेड तालुक्यातील वरची भांबुरवाडी येथे घडली. सचिन वाळुंज असे या पोलीस पाटीलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात सचिन वाळुंज हे जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताच्या मनगटाला गोळी लागली असून त्यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर राजगुरुनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती खेड पोलिसांनी दिली आहे.
आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाची अधिक चौकशी देखील सुरू आहे.