प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमध्ये दिवसेंदिवस ख्रिश्चन समाजाची संख्या वाढत आहे. परंतु त्या मानाने दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे ती अपुरी पडत असल्याने जिल्हा प्रशासनाने ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी 5 एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ख्रिश्चन समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली.
बेळगावमध्ये सध्या 30 हजारहून अधिक संख्येने ख्रिश्चन समाज वसलेला आहे. परंतु या समाजाला दफनभूमीसाठी मोठी जागा नाही. जुन्याच जागांवर दफनविधी करण्याची वेळ आली आहे. यामुळे समाजबांधवांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून समाजाला दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी ख्रिश्चन समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.