प्रतिनिधी / बेंगळूर
ब्रिटनसह विविध देशांमध्ये नव्या स्वरुपाचा कोरोना आढळून आल्यानंतर राज्य सरकारने सुरक्षा मार्गसूची जारी केली असून त्यातील नियमांचे 2 जानेवारी 2021 पर्यंत पालन करण्याचे आदेश दिले आहेत. ख्रिसमस आणि नववर्ष साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत सामान्य फटाके उडविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. केवळ हिरव्या फटाक्यांच्या (ग्रीन क्रॅकर्स) वापरास अनुमती देण्यात आली आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पाटर्य़ांचे आयोजन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
राज्य सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी हा आदेश दिला आहे. 2005 च्या आपत्ती नियंत्रण अधिनियम 24 अंतर्गत असणाऱया विशेष अधिकाराचा वापर करून विजयभास्कर यांनी मार्गसूची जारी केली आहे. त्यांची अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, पोलीस आयुक्त आणि विविध खात्यांचे प्रमुख आणि संबंधीत प्राधिकरणांना देण्यात आली आहे.
राज्य सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी हा आदेश दिला आहे. 2005 च्या आपत्ती नियंत्रण अधिनियम 24 अंतर्गत असणाऱया विशेष अधिकाराचा वापर करून विजयभास्कर यांनी मार्गसूची जारी केली आहे. त्यांची अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, पोलीस आयुक्त आणि विविध खात्यांचे प्रमुख आणि संबंधित प्राधिकरणांना देण्यात आली आहे.
नियमावली…
- खिश्चन बांधवांनी ख्रिसमसवेळी हस्तांदोलन, आलिंगन देणे टाळावे.
- चर्चमध्ये एकाचवेळी 200 पेक्षा अधिक जणांनी एकत्रित येऊ नये.
- पब, क्लब, बार-रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये सामाजिक अंतर राखावे.
- डीजे, कार्यक्रम, पाटर्य़ांचे आयोजन करू नये.
- नववर्ष साजरे करताना सार्वजनिक ठिकाणे, रस्ते व इतर ठिकाणी मोठय़ा संख्येने एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करण्यावर निर्बंध.
- हॉटेल, मॉल, पब, रेस्टॉरंट आदी ठिकाणी मालकांनी सामाजिक अंतर राखले जाईल, याची खबरदारी घ्यावी. प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी किंवा टोकन व्यवस्था करावी.
- 65 वर्षांवरील व्यक्ती आणि 10 वर्षांखालील मुलांनी घरीच रहावे.