सातारा / प्रतिनिधी :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सुकाणू समिती गठीत केली आहे. त्यामध्ये साताऱ्याचे शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असून, समितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह आमंत्रित सदस्य म्हणून छत्रपती संभाजीराजे यांचा समावेश आहे. तर सदस्य म्हणून शिवसेना सचिव आदेश बांदेकर, आंमत्रित सदस्य म्हणून मिलिंद गुणाजी, ऋषिकेश यादव, माधव फडके, उमेश झिरपे, नितीन बानुगडे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.