बेळगाव / प्रतिनिधी
गणपत गल्ली येथील व्यापाऱयांच्यावतीने बुधवारी भारतमाता पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. दरवषी प्रजासत्ताक दिनानंतर शहराच्या विविध भागांमध्ये भारतमाता पूजनाचे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून व्यावसायिक कृष्णा भट उपस्थित होते.
कृष्णा भट यांनी सध्या देशात देशविरोधी घडत असलेल्या घटनांचा समाचार घेतला. देशाच्या फाळणीची वक्तव्ये करणाऱयांना देशात राहण्यात अधिकार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी भारतमातेच्या फोटोचे पूजन करण्यात आले.
यावेळी दिलीप मोरजकर, विजय होंडर, शेखर हलगी, परिपोष पोतदार, प्रवीण महिंद्रकर, अजित कोकणे, रणजित लाड, सुजित बाळेकुंद्री, संदीप घोडके, गौरव कुंटे, हरिष राजपुरोहित, अशोक राजपुरोहित, अर्जुनराव गौडाडकर, राजू चौगुले यासह इतर सदस्य व व्यापारी उपस्थित होते.