प्रतिनिधी/ म्हापसा
गेणेशपुरी रेसिडेंट्स सोसायटीचे अध्यक्ष विश्वास पिळणकर यांनी बोलाविलेली तातडीची बैठक रेकॉर्डब्रेक उपस्थितीत वादळी खडाजंगीत बरीच गाजली.
गणेशपुरीतील मैदान म्हापसा नगरपालिकेतर्फे ‘एफसी गोवा’ला दुरुस्ती आणि निगा राखण्यासाठी देण्याच येण्याचा जो ठराव विचाराधीन आहे त्याची बातमी वर्तमानपत्रात झळकल्याने सदर तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. गणेशपुरी रेसिडेंट सोसायटीला अनभिज्ञ ठेवून कुणाचेही मत विचारात न घेता मैदान ‘एफसी गोवा’ला देण्याचा घाट घालण्यात आल्याचा राज उपस्थित सदस्यांनी तावातावाने बोलून दाखविला. सुरुवातील सोसायटीचे अध्यक्ष विश्वास पिळणकर यांनी सदर मैदान ‘एफसी गोवा’ला देण्याबाबातची वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचून दाखविली आणि सोसायटी याबाबत अंधारात असल्याचे सांगून सदर ठरावावर सर्व सदस्यांचे मत जाणून घेण्यासाठी चर्चा छेडली.
यावेळी व्यासपीठावर सोसायटीच्या अध्यक्षांसमवेत नगरसवक संजय मिशाळ, सचिव संजय मडगावकर, खजिनदार-भालचंद्र नाटेकर, ऍड. मिलींद देसाई उपस्थित होते. नगरसेवक संजय मिशाळांनी सदर प्रस्ताव फक्त विचाराधीन असल्याचे सांगितले. मैदानाच्या मेंटेनन्स चा खर्च झेपत नसल्याचे सांगून आपण पण नगरसेवक या नात्याने गणेशपुरीतील विकासकामांची पाठराखण करत असल्याचे सांगितले. ‘एफसी गोवाकडे गेल्यास फक्त फुटबॉलसाठीच मैदान वापरायला मिळेल ही भीती खोटी असल्याचे सांगत एखादा सुरक्षारक्षक ठेवला जाऊन बाहेरच्याना आडकाठी आणून मैदानाचा गैरवापर टळू शकेल असंही नगरसेवकांनी सांगितले. मागेही मैदानाच्या नूतनीकरणासाठी असाच विरोध करण्यात आलेला त्याची आठवण करून देत नंतर मैदानाचा कायापालट घडवून आणल्याचे सगळय़ांना आवडल्याचे ते म्हणाले.
आज ‘एफसी गोवाला मैदानाची देखभाल करण्यास हरकत घेतली नाही तर नंतर त्यांचीच त्यावर मालकी होईल हा गैरसमज असल्याचे सांगून सर्व गोष्टी चर्चेतून स्पष्ट करू असे ते म्हणाले. वर्तमानपत्रात छापून येते त्यावर विसंबून न राहता अजून अशी फक्त योजना असल्याचे सांगत त्यावर सर्व संमतीनेच निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. त्यानंतर मैदानाचे व्यवस्थापन आणि डागडुजी ‘एफसी गोवा’ला द्याची की नाही यावर बऱयाच सदस्यांनी आपली मते मांडली. सर्वस्वी गोकुळदास नागवेकर, डॉ. गुरुदास नाटेकर, उल्हास भिवशेठ, प्रशांत वाळके, रामचंद्र प्रभू, आशिष कवळेकर, राजाराम सावंत, रवींद्र फोगेरी आदी बऱयाच जणांनी यावर रेसिडंट सोसायटीला विश्वासात न घेता मैदान ‘एफसी गोवा’ला द्यायला विरोध दर्शविला. तावातावाने बोलताना डॉ. गुरुदास नाटेकर आणि नगरसेवक संजय मिशाळ यांची बरीच तू तू मै मै झाली. त्यात खजिनदार भालचंद्र नाटेकर यांनीही आपली खदखद बोलून दाखविली. बैठकीचे वातावरण बरेच तापलेले आढळले.
नगरसेवक संजय मिशाळ विरुद्ध बाकी सगळे असे चित्र पहायला मिळाले. नगरसेवक संजय मिशाळचे म्हणणे होते की प्रत्येक गोष्ट विचारून करत बसायला शक्य नसते तसेच लोकांच्या पाठिंब्याने आपण निवडून आलो असल्याने गणेशपुरीतील बहुसंख्य रहिवाशांचा आपल्यावर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर सदस्यांनी विकासकामांना कुणीही विरोध करत नसल्याचे सांगत फक्त मैदानाबाबतचा निर्णय सर्वांना विचारून माहिती देऊन शंकानिरसन करून घेण्यात याना असे सांगितले आणि तशा प्रकारचा ठराव दीड तासावर चालेल्या बैठकीअंती मांडण्यात येऊन तो सर्वानुमते एकमताने पारित करण्यात आला. सर्व बाबींचा उहापोह करण्यात येऊन पूर्ण विचारांती निर्णय घेण्याचे ठरले. कुणी टिळक मैदानाचा दाखला देत तर कुणी धुळेर फुटबॉल ग्राऊंडचा दाखला देत आपले म्हणणे ठासून मांडण्याचा प्रयत्न केला. गणेशपुरीतील बरीच विकासकामे विचाराधीन असल्याचे सांगत नाना-नानी पार्क, ट्रफिक आयलॅँड, बस स्टॉप, स्पीड ब्रेकर इdयादीसाठी ही सर्वांची संमती लागेल का असा प्रश्न नगरसेवक संजय मिशाळ उद्वेगाने करून राहिले. वर्तमानपत्रात मतभेद आणू नरा असे सांगितल्यावर डॉ. गुरुदास नाटेकर वर्तमानपत्रात प्रथम कोण गेला हे वारंवार विचारून राहिले.
मैदानाचा प्रश्न सगळय़ांसाठी जिव्हाळय़ाचा होता हे कळून येतानाच निवडणुकीतील यशापयशातले वचपे हेही त्यामागचे कारण असल्याचे त्रयस्थाना जाणवून राहिले. गणेशपुरीचे रहिवासी एकमताने ठरावाद्वारे नगरपालिकेने मैदान एफसी गोवाला देण्याच्या विरोधात असल्याचे सांगतानाचमैदैनाबद्दल निर्णय घएताना सोसायटी तसेच सर्व सदस्य आणि रहिवाशांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा तशा आशयाचा ठराव सरतेशेवटी संमत करण्यात आला. बरीच वादळी ठरलेली बैठक योग्यप्रकारे हाताळण्यात सोसायटीचे अध्यक्ष विश्वास पिळणकर यशस्वी ठरले. ऍड. मिलींद देसाई आणि गोकुळदास नागवेकर बैठकीत छापा पाडून राहिले.