भाजप नेते किरण जाधव यांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येवून ठेपला आहे. बेळगावत सार्वजनिक गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. पण अद्यापही जिल्हाप्रशासनाकडून गणेश उत्सवाची मार्गसूची जाहीर करण्यात आली नाही तरी मार्गसूची लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी भाजप नेते किरण जाधव यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱयांकडे केली.
बेळगावमध्ये मोठय़ा उत्साहात दरवषी गणेशोत्सव साजरा होतो. यावषी गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला तरी प्रशासनाने अद्याप नियमावली जाहीर केलेली नाही. नियमावलीच नसल्याने गणेशोत्सव मंडळे व मूर्तिकार अजुनही संभ्रमात आहेत. आताच मार्गसूची जाहीर झाल्यास गणेशोत्सव साजरा करणे सोयीचे ठरणार असल्याने लवकर मार्गसूची जाहीर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी केली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदन स्वीकारून याबाबत याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.