प्रतिनिधी /वाळपई
गणेश चतुर्थीच्या तोंडावर वाळपई शहरामध्ये आज दिवसभर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली. यामुळे गणेशभक्तांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करण्यात येत होती .वारंवारपणे खंडित होणारा वीजपुरवठा व त्यातच काही गावांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटना दिसला .वाळपई शहरांमध्ये दिवसभर मोठय़ा प्रमाणात माटोळीच्या बाजाराच्या खरेदीसाठी गणेशभक्तांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.
याबाबतची माहिती अशी की वाळपई ही सत्तरी तालुक्मयातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. ग्रामीण भागातील नागरिक मोठय़ा प्रमाणात वाळपई शहरांमध्ये खरेदीसाठी येत असतात. गणेश चतुर्थीचा सण शुक्रवारी साजरा करण्यात येत असल्यामुळे आज गुरुवारी मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी माटोळी सामानाची खरेदी व वेगवेगळय़ा प्रकारच्या खरेदीवर भर दिला .यामुळे सकाळ ते संध्याकाळपर्यंत वाळपई शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली .गणेश भक्त वेगवेगळय़ा प्रकारची खरेदी करताना दिसत होते. माटोळीचे सामान खरेदी करण्यावर जास्त प्रमाणात भर देण्यात आला होता तर सजावटीचे सामान खरेदीसाठीही मोठय़ा प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली
वाहतुकीची सातत्याने कोंडी.
वाळपई शहरात मी त्र सातत्याने वाहतुकीची कोंडी पहायला मिळाली. आज दिवसभर अनेकवेळा वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडला .वाळपई मध्यवर्ती परिसरा बरोबरच ठाणे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली .यामुळे अनेक स्तरावर वाहने अडकून पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. महत्त्वाचे म्हणजे ठाणे रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क करून ठेवण्यात येत असल्यामुळे ही वाहतुकीची कोंडी सातत्याने होत असते. आज मात्र याबाबत नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या समस्यांना तोंड द्यावे लागले.
वाळपई पोलीस स्थानकाचा कर्मचारी वर्ग होमगार्ड व वाहतूक पोलीस ही वाहतुकीची कोंडी
दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. मात्र अनेक ठिकाणी बेशिस्त पार्किंग त्यामुळे वाहतुकीला बऱयाच प्रमाणात अडचणी निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले .रात्री आठ वाजेपर्यंत अशाच प्रकारची परिस्थिती सातत्याने पहावयास मिळत होती.
माटोळी सामान खरेदीसाठी झुंबड.
दरम्यान शुक्रवारी गणेश बाप्पाचे आगमन होणार आहे .यावेळी माटोळीची सजावट होणार आहे. यासाठी वाळपईमध्ये माटोळी सामानाच्या खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांनी माटोळीचे सामान मोठय़ा प्रमाणात वाळपई शहरात विक्रीसाठी आले होते. यामध्ये जंगल संपत्तीच्या वेगवेगळय़ा प्रकारच्या वस्तूंचा समावेश होता. वाळपई शहराच्या फातिमा कॉन्व्हे?ट रस्त्यावर ही व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मोठय़ा प्रमाणात नागरिक या संदर्भातील खरेदी करताना दिसत होते. त्याचबरोबर फळांची खरेदी करण्यावर मोठय़ा प्रमाणात भर देण्यात येत होती.
वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार
दरम्यान आज दिवसभर अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली. अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यवसायामध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. एका बाजूने मोठय़ा प्रमाणात खरेदीसाठी गर्दी तर दुसऱया बाजूने वारंवारपणे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार यामुळे नागरिक व व्यवसायिकानी नाराजी व्यक्त केली. संध्याकाळच्या सत्रात मात्र काही प्रमाणात वीजपुरवठा सुरळीत झाला मात्र सकाळच्या सत्रात वारंवारपणे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होते.
त्याचप्रमाणे गेल्या चार दिवसापासून सत्तरी तालुक्मयांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत आहे .गुरुवारी सकाळी पावसाने जोमदारपणे हजेरी लावली तर बुधवारी दिवसभर डों गराळ भागांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले होते. यामुळे सत्तरी तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये दाबोस पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून गढूळ पाणीपुरवठा करण्यात येत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या. मात्र संध्याकाळपर्यंत याची तीव्रता कमी झाल्याचे अनेक नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.