ऑनलाईन टीम / सुरत :
गुजरातमधील सुरतमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 15 मजुरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे हा अपघात झाला. या अपघातात काही मजूर चिरडले गेले असून त्यापैकी अनेकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, ही घटना सुरतमधील कोसाम्बामध्ये घडली. यामध्ये 13 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जणांची स्थिती गंभीर आहे. सर्व मजदुर राजस्थानमधील रहिवासी आहेत.
जखमी मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात झाला तेव्हा घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्याकडेला झोपलेल्या मजुरांच्या अंगावर गेला. पोलिसांनी या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. रात्री या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून मदतकार्य सुरु आहे.