दिग्दर्शक तुषार हिरनंदानी यांचे मत
प्रतिनिधी / पणजी
कुठलाही चित्रपट किंवा बायोपिक करण्यासाठी सुपरस्टारची गरज नाही. एका चांगल्या कलाकाराची गरज आहे. जर एक दिग्दर्शक सात वर्षांच्या मुलींना घेऊन चित्रपट तयार करू शकतो तर अशाप्रकारच्या चित्रपटांना किंवा बायोपिक चित्रपटांना कुठल्याही सुपरस्टार अभिनेत्याची गरज नाही तर एका चांगल्या कलाकाराची गरज आहे असे मत सांड की आँख चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार हिरनंदानी यांनी 51व्या आंचिममध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पंचिका पाच गारगोटय़ांचा खेळ जो एक गारगोटी हवेत टाकून झेलतो. सात वर्षाच्या मुलींना समाजाच्या सांगण्यामुळे आपली मैत्री तोडावी लागते. या चित्रपटाची कथा व्यंकटेश माडगूळकरांची असून त्या कथेचे भाषांतर गुजरातीमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. पांचिका चित्रपटासाठी सुमारे 300 मुलींचे ऑडिशन घेतले. विविध गावात जाऊन या कथेसाठी योग्य असेल अशा मुली शोधल्या. त्यानंतर या दोन मुली भेटल्या. परंतु त्यांना अभिनय शिकविणे हे मोठे आव्हान होते. हे आव्हान पेलले आणि चित्रपटाची संपूर्ण टीम एका घडय़ाळाच्या आकारात उभी राहिली आणि मी व त्या दोन मुली मध्यभागी राहून त्यांना फक्त घडय़ाळय़ासारखे पाऊल टाकण्याची दिशा सांगितली अशा प्रकारे चित्रपट चित्रित करण्यात आला अशी माहिती पंचिका लघुपटाचे दिग्दर्शक अंकित कोठारी यांनी दिली.
मला दिग्दर्शक बनायचे नव्हते. निवृत्त होऊन शेती करायची होती. 60 व्या वर्षी मुलींसाठी आपले जीवन पुन्हा सुरू करण्याचे ठरवितात. चित्रपट बनविण्यापूर्वी पटकथेमध्ये बदल होत होते. भारतात अनेक अशा गोष्टी, कथा लपलेल्या आहेत. त्या शोधून काढून त्यावर चित्रपट बनविण्याची इच्छा आहे. असे तुषार हिरनंदानी यांनी सांगितले.
तुषार यांच्यासोबत काम करायला मला आवडले. काही कथा आपल्याला प्रोत्साहन देतात. चित्रपटातील दोन जावा समाजाचा विचार न करता पुढील पिढीसाठी काही वेगळे करण्याचे ठरवितात जे साजरा करण्यासारखे आहे सुभाशिष सरकार यांनी सांगितले.
कथा सांगितल्यावर जातीवाद असतानाही, त्यांच्या जीवनाचा संघर्ष मनाला लागला. या दोन निष्पाप मुलींचा मनाला भावला. या दोन वेगळय़ा गावातील मुली. एकच समाजात असल्यावर कळल्यानंतर त्यांना एकत्र खेळायला परवानगी मिळते. उत्तमरित्या लघुपटात या दोन मुलींचे चित्रण करण्यात आले आहे असे श्रेयंका चटर्जी यांनी सांगितले.