ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांच्या मंत्रिमंडळातील 24 नव्या मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यामध्ये 10 कॅबिनेट आणि 14 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही.
नव्या मंत्रिमंडळात राजेंद्र त्रिवेदी, नरेश पटेल, प्रदीप सिंह परमार, अर्जुन सिंह चव्हाण, ऋषिकेश पटेल, कनुभाई देसाई, किरीट सिंह राणा, जीतू वाघानी, राघव पटेल, पूर्णेश मोदी यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.
तर निमिषा सुतार, मुकेश पटेल, अरविंद रैयाणी, कुबेर डिंडोर, किर्ती सिंह वाघेला, गजेंद्र सिंह परमार, हर्ष सांघवी, बृजेश मेरजा, मनिषा वकील, जगदीश पांचाल, जितू चौधरी, देवा मालम, राघवजी मकवाना, विनोद मोराडिया यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
दरम्यान, नव्या मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज दुपारी 4.30 वाजता गांधीनगर येथे आयोजित केली आहे, याच बैठकीत मंत्र्यांचे खातेवाटप होण्याची शक्यता आहे.