‘कोरोना-लॉकडाऊन’मुळे विवाह सोहळे लांबणीवर, कित्येकांचे विवाह नोंदणीचे सोपस्कारही अर्धवट
प्रसाद नागवेकर / मडगाव
एप्रिल व मे महिने एरव्ही गोमंतकीयांसाठी लगबगीचे असतात. कारण हा काळ लग्नाचा मोसम मानला जातो. कित्येक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्यास सज्ज झालेले असतात. मात्र यंदा अशी लगबग दिसून येत नाही. कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या सावटाखाली नवरोबांना गुडघ्यावरील बाशिंग डोक्मयावर चढविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार हे मात्र खरे…
एप्रिल व मे महिन्यांत गोव्यातील हिंदू तसेच ख्रिस्ती समाजात मोठय़ा प्रमाणात विवाह सोहळे पार पडत असतात. त्यासाठी आगावू नियोजन केले जात असते. त्याप्रमाणे लग्नासाठी इच्छुक असलेल्या शेकडो युवक-युवतींनी तयारी चालविली होती. गोव्यात समान नागरी कायदा असल्याने सब-रजिस्ट्रार कार्यालयात कित्येकांनी विवाहाची नोंदणी केली होती. कित्येकांच्या दोन्ही सह्या झाल्या होत्या, तर काहींच्या दुसऱया सह्या होणे बाकी होते, अशी माहिती विवाहाची नोंदणी करणाऱया कार्यालयातून मिळाली.
नोंदणीची मुदत वाढवून देणार
सासष्टी रजिस्ट्रार कार्यालयाचे सब-रजिस्ट्रार सूरज वेर्णेकर यांनी नवीन विवाह नोंदणीला लॉकडाऊनचा फटका बसला असल्याचे सांगितले. ज्यांची नोंदणी राहून गेलेली आहेत त्यांनी चिंता करण्याची गरज नसून अशांना मुदत वाढवून दिली जाणार असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ख्रिस्ती समाजातील अनेकांचा हिरेमोड
ख्रिस्ती समाजात इस्टरनंतर विवाह सोहळय़ांची रेलचेल असते. त्यासाठी कित्येकांनी तयारी केली होती. काहींची विवाह नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली होती. परंतु लॉकडाऊन असल्याने चर्च बंद आहेत. मोठय़ा संख्येने लोकांना एकत्र येण्यावर बंधने आहेत. त्यामुळे कित्येकांना लग्नाच्या तारखा पुढे ढकलणे भाग पडणे आहे. काही बोहल्यावर चढणार असलेले तरुण तसेच तरुणी परदेशात कामावर असून विमानसेवा खंडित झाल्याने त्यांना मायदेशी परतणे शक्मय होत नाही. कोरोनारूपी विघ्न त्यांच्यासमोर आ वासून उभे राहिले असल्याचे दिसून येत आहे.
व्यावसायिकांनाही जबर फटका
राज्यातील हिंदू समाजात तर अक्षय्यतृतियेनंतर एप्रिल व मे महिन्यांत लग्न सोहळय़ांचा सपाटाच लागत असतो. पण लॉकडाऊनमुळे अनेक इच्छुकांच्या आनंदावर सध्या विरजण पडले आहे. लग्न सोहळा म्हणजे दागिने-कपडे खरेदीसाठी गर्दी असते. त्यामुळे याचा फटका सोनार, कपडेविपेते, कॅटरिंग व्यावसायिक, सभागृहांचे मालक व अन्य संबधितांनाही बसला आहे. आपणास एप्रिल व मे महिन्यांतील विवाह सोहळय़ांतील कॅटरिंगच्या कित्येक ऑर्डर्स मिळाल्या होत्या. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एक-एकटा ऑर्डर रद्द करू लागला असल्याची माहिती नलिनी कॅटरिंगचे मालक शंकर उर्फ बाबू कुडाळकर यांनी दिली. या पार्श्वभूमीवर गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या तरुण-तरुणींच्या हाती प्रतीक्षा करण्यावाचून दुसरा पर्याय राहिलेला नाही हे मात्र खरे…