@ बेळगाव / प्रतिनिधी
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी विकास संस्था यांच्यावतीने सीमाभागातील मराठी विषय शिक्षकांसाठी आयोजित ‘अध्ययन-अध्यापन’ कार्यशाळेला बुधवारपासून प्रारंभ झाला. मराठी विद्यानिकेतन येथे झालेल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रा. संध्या देशपांडे, सुभाष ओऊळकर, चंद्रकांत पाटील, प्रा. आनंद मेणसे, सुरेश गडकरी, बी. बी. शिंदे उपस्थित होते.
बी. बी. शिंदे यांनी प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांची ओळख करून दिली. चंद्रकांत पाटील यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेचे पहिले पुष्प प्रा. डॉ. संध्या देशपांडे यांनी गुंफले. ‘मराठी अध्यापन कौशल्य व शिक्षक’ या विषयावर त्यांनी मांडणी केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रबोधिनीचे इंद्रजीत मोरे, गजानन सावंत, प्रसाद सावंत, धीरजसिंह रजपूत यांनी परिश्रम घेतले. गुरुवार दि. 29 रोजी प्रा. डॉ. माधुरी शानभाग या ‘भाषा समृद्ध होण्यासाठी’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.