साताऱयात वीज, वाऱयासह पावसाची हजेरी
प्रतिनिधी / सातारा
शहर परिसरासह जिल्हय़ात अवकाळी पावसाने गुरूवारी चांगलाच धुमाकुळ घातला. कित्येक भागात वादळी वाऱयासह पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. वादळी वाऱयासह पडलेल्या तुरळक पावसामुळे कित्येक ठिकाणी झाडांची पडझड झाली होती. गुरुवार पेठेतील जमदाडे यांच्या बागेतील नारळाच्या झाडावर वीज पेडल्यने उभ्या झाडाने पेट घेतला होता.
गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती. आधिच कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यातच आता वातावरणात कमालीचा बदल होत असल्याने नागरिकांची चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला सारखी लक्षणे होऊ नयेत याकरीता दक्षता म्हणून विविध प्रकारची औषधिक काढे करून पिणे, वाफारे घेण्याचे विविध प्रयोग करण्यात येत आहेत.
या आठवडय़ात तर पुन्हा या अवकाळी पावसाचे सत्र सुरूच झाले आहे. हवामान खात्याने गुरूवारी जवळपास तीन तास पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. जिल्हय़ातील जवळपास सर्वच भागात या अवकाळी पडणाऱया पावसाने चांगलाच धुमाकुळ माजविला होता. शेतात कापणी करण्यात येत असलेल्या शेतकऱयांची या अचानक पडलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. तसेच सध्या लॉकडाऊन असल्यामुळे शहराच्या मुख्य रस्ते ही सुनेसुने पडले होते.
पेटत्या झाडाचे व्हिडीओ व्हायरल
अवकाळी पावसाने गुरुवारी सातारा शहरात नागरिकांची तारांबळ उडाली. गुरुवार पेठेतील जमदाडे यांच्या बागेतील नारळाच्या झाडावर सायंकाळी वीज पडल्याने नारळाचे झाड पेटू लागले. बघणाऱयांनी याचे फोटो व व्हिडीओ काढले व ते सोशल मीडीयावर व्हायरल केले.