तरुणाला अटक, काकती पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
गोजगा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेनंतर काकती पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोजगा येथील विशाल कुमार बामणे (वय 20) याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर त्या मुलीने या घटनेची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी काकती पोलीस स्थानकात विशाल याच्या विरोधात फिर्याद देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी विशाल याला अटक करुन त्याच्यावर गुन्हा नेंदविला आहे. या घटनेमुळे गोजगा परिसरात खळबळ माजली आहे.