प्रतिनिधी /फोंडा
मराठी राजभाषा समिती गोवाचे अध्यक्ष तथा लेखक गो. रा. ढवळीकर यांनी लिहिलेल्या ‘गोमंतकाचा सत्याग्रह महासंग्राम’ या मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. 4 जून रोजी सायं. 4.30 वा. खडपाबांध-फोंडा येथील विश्व हिंदू परिषद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
मराठी राजभाषा समिती, गोवा व गोमंतक मराठी भाषा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱया या प्रकाशन सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून वीजमंत्री सुदिन ढवळीकर तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार परेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. साहित्यप्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन भाषा परिषदेचे अध्यक्ष डॉ. मधू घोडकिरेकर व मराठी राजभाषा समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांनी केले आहे.