प्रतिनिधी / बेळगाव
गोमंतक मराठा समाजातर्फे महिला दिनानिमित्त मुंबई येथे महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष उमेश नाईक, आर्किटेक्ट जयवंत नाईक यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी अरुणा नाईक, जयश्री पर्वतकर, गुरुदास लोयलेकर, प्रकाश बाडकर आदी उपस्थित होते. सदर सन्मानपत्र सिस्टर नलिनी कृ. नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे बंधू आर्किटेक्ट जयवंत कृ. नाईक व कुटुंबीयांनी पुरस्कृत केले आहे. याच कार्यक्रमात जयवंत नाईक यांनी त्यांचे गुरु बेळगावचे कलामहर्षि कै. के. बी. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दिनिमित्त प्रकाशित केलेल्या शतकांचे संचित या अंकाची प्रत महापौरांना भेट दिली. महापौरांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.