प्रतिनिधी/ बेळगाव
वास्को-हजरत निजामुद्दीन (दिल्ली) या दरम्यान धावणारी गोवा एक्स्पेस आता सुधारित वेळेनुसार धावणार आहे. रेल्वे विभागाने काही स्थानकांच्या वेळांमध्ये बदल केला आहे. 23 डिसेंबरपासून या सुधारित वेळेनुसार रेल्वे धावणार आहे.
वास्को द गामा येथून दुपारी 3 वाजता निघणार आहे. मडगाव, कुडचडे, कोलेम, कॅसलरॉक, लोंढामार्गे रात्री 7.45 वा. बेळगावला पोहोचणार आहे. यानंतर घटप्रभा, रायबाग, कुडची, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, हरडा, इटारसी, भोपाळ, झांसी, ग्वाल्हेर, आग्रा, मथुरा, हजरत निजामुद्दीन येथे तिसऱया दिवशी पहाटे 6.25 वा. पोहोचणार आहे.
दुपारी 2.50 वा. हजरत निजामुद्दीन येथून निघालेली रेल्वे तिसऱया दिवशी रात्री 1.10 वा. बेळगावला तर सकाळी 7.25 वा. वास्को येथे पोहोचणार आहे. प्रवाशांनी या नव्या वेळापत्रकानुसार प्रवास करण्याचे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.