वार्ताहर /खोल
काणकोण, चावडी येथील बेर्नादबाब कॉम्प्लेक्स येथे गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन 28 रोजी सायंकाळी 4 वा. होणार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी काणकोण पत्रकार कक्षात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. उद्घाटन समारंभास पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर, अध्यक्ष असलेले आमदार विजय सरदेसाई, आमदार विनोद पालयेकर, जयेश साळगावकर उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस प्रशांत नाईक व उमेश तुबकी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत काणकोण मतदारसंघातून गोवा फॉरवर्ड पक्ष रिंगणात असेल असे याआधीच जाहीर केलेले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्ष एकत्र येऊन पक्षाचा उमेदवार उतरविला जाईल असे संकेत पत्रकार परिषदेत देण्यात आले. यावेळी देखील ही शक्मयता नाकारता येत नाही. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व अन्य समविचारी पक्षाची युती झाली, तरी काणकोण मतदारसंघावर गोवा फॉरवर्डचा दावा राहील, असे लोलयेकर यांनी स्पष्ट केले.
12 मतदारसंघांतील आमच्या उमेदवारांची सूची तयार आहे. 40 ही मतदारसंघांत निवडणूक लढवण्याची आमची क्षमता असून बजबजपुरी माजलेल्या व भ्रष्ट भाजप सरकारला धडा शिकविण्याची गरज आहे, असे लोलयेकर म्हणाले. काणकोण तालुक्मयात विद्यार्थ्यांस इंटरनेट व्यवस्थेचा अभाव, बेरोजगारीचा प्रश्न, धोरणविरहीत शासन अशा अनेक समस्या आहेत. नोकरभरतीचे गाजर दाखवून भाजप सरकार बेरोजगारांना लुटण्याचा डाव खेळत आहे, अशी टीका प्रशांत नाईक यांनी केली.