प्रतिनिधी / फोंडा
गोवा राज्य सहकारी युनियनच्या अध्यक्षपदी अंत्रुज महाल कॉ ऑपरेटिव्ह सोसायटीचे ज्येष्ठ सभासद श्रीकांत नाईक यांची निवड झाल्याबद्दल अंत्रुज सोसायटीतर्फे त्याचा नुकताच गौरव करण्यात आला.
अंत्रुज संस्थेचे अध्यक्ष नारायण नाईक यांच्याहस्ते झालेल्या गौरव सोहळय़ात उपाध्यक्ष अलंकार पारकर, सदस्य जयवंत आडपईकर, शब्बीर शेख, माणिकराव मामलेकर, सुदेश नाईक, रामनाथ मामलेकर, नारायण नाईक, रामनाथ गुडेकर, व्यवस्थापक सविता इब्रामपूरकर, कर्मचारी बाबल नाईक उपस्थित होते. यावेळी बोलताना नारायण नाईक म्हणाले की श्रीकांत नाईकच्या रूपाने सहकार क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची युनियनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यामुळे सहकार वृद्धिची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. श्रीकांत नाईक यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्याबद्दल राज्यातील सर्व सहकारी संस्थाना भरारी घेण्यास मदत होईल असे जयवंत नाईक यांनी भाकित केले. यावेळी अलंकार पारकर, शब्बीर शेख, सुदेश नाईक व रामनाथ मामलेकर यांनी विचार मांडले.
सत्काराला उत्तर देताना श्रीकांत नाईक म्हणाले की राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्था मी सरकारच्या सहकार्याने उर्जा अवस्थेत आणण्यावर आपला भर राहिल. प्रत्येक संस्थाच्या अडीअडचणी समजून घेईन त्याना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करण्याचे त्यांनी सुचित केले.
नारायण नाईक यांनी स्वागत केले. सविता इब्रामपूरकर यांनी आभार मानले.