वाहन एक, चालक एक,अवघ्या मिनिटात चलन दोनदा… : वाहतूक पोलिसांचे अज्ञान, अरेरावी भाषेमुळे वाहनचालक त्रस्त
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा शहर परिसरात शासकीय शिगमोत्सव वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला खरा मात्र फोंडा वाहतूक पोलिसांतर्फे शहर परिसरात पावलोपावली चलन फाडण्यासाठी तैनान केल्याने शिगम्यासारखे स्वरूप झालेले आहे. येथील तैनात पोलीस विनाहेल्मेट दुचाकीचालकांशी कोणतीही ठोस चौकशी न करता सरळ दुचाकीची चावी हिसकावतात व वाहतूक परवान्याची मागणी करून चलन फाडण्य़ाच्या प्रकारामुळे कुर्टी फोंडा येथील एका दुचाकीचालकांना मनस्ताप सहन कराला लागला आहे.
प्राप्त माहितीनुसार काल रविवारी घडलेल्या एका घटनेत बुधवार पेठ मार्केट परीसरात दुचाकीवर हेल्मेट परिधान न केल्यामुळे दोन वेळा दंडात्मक कारवाई करून फोंडय़ातील वाहतूक पोलिसांनी आपल्या अज्ञानतेचे दर्शन घडविले आहे. यावेळी हुज्जत घालताना त्यांनी त्या दुचाकीचालकांना तब्बल दीड तास घटनास्थळवर थांबून ठेवले व पैशाची मागणी पुर्ण झाल्यानंतरच त्याला सोडून देण्यात आले. याप्रकरणी दुचाकीचालकांची समजून काढण्याऐवजी त्याच्यावर खोटे बोलत असल्याचा आळही सहाय्यक उपनिरीक्षकाबरोबर डय़ुटी बजावत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने घातला. सदर दुचाकीचालक आपल्या लहान मुलांसाठी औषाधे नेण्यासाठी बाजारात आला होता. त्याला तब्बल दीड तास रखरखत्या उन्हात उभे करून ठेवण्याची शिक्षा फोंडय़ातील वाहतूक पोलिसांनी दिले. वाहतूक पोलीसांनी कायद्याच्या चौकटीत राहून जनतेशी संवाद साधणे गरजेचे आहे. शिस्त व नियमाचे पालन करणाऱयासाठी सज्ज असलेल्य़ा पोलिसांना समुपदेशन व शिस्तीवर आणण्याची गरज असल्याचे मत सुभाष कुट्टीकर यांने मांडले आहे. आपल्याला विनाकारण मनस्ताप करणाऱया दोन्ही पोलिसांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी प्रसारमाध्यामांशी बोलताना केली आहे.
बागायतदार परिसरात पोलिसांचा शिमगा, तरीही वाहतूक कोंडी कायम
फोंडा शहर परिसरात दादा वैद्य चौक परिसर ते बुधवार पेठ वन वे मार्ग पर्यंत किमान सहा ठिकाणी वाहतूक पोलीस चलन फाडण्य़ासाठी तैनात असतात. त्याना वाहतूक कोंडीचे कोणतेच सोयरसुतक नसून ती जबाबदारी होमगार्ड बजावताना दिसतात. वाहतूक पोलिसांना फक्त चलन फाडण्य़ाचे टार्गेट पुर्ण करण्याची घाई झालेली दिसते. गोवा बागायतदार जन्क्शन परिसरात अवजड वाहने ये-जा करीत असताना वाहतूक कायद्याचे भान त्यांना राहत नाही. गडद काळय़ा रंगाच्या काचाच्या वाहने बिनधास्त ये-जा करतात त्याच्यावर कारवाई नाही, रोष फक्त दुचाकीवाल्य़ावर का? असा सवाल चलन घेतलेले दुचाकीचालक करताना दिसतात.
रस्त्याची स्थिती आधी सुधारा नंतर चलन फाडा…
फोंडय़ातील रस्त्याची परिस्थिती पाहिल्यास रस्त्यावरून दुचाकी चालविणे कठीण झालेले आहे. मागील पाच वर्षापासून मलनिस्सारण प्रकल्पाच्या खोदकामामुळे खड्डेमय झालेल्या रस्त्यातून वाट काढताना नाकीनऊ येत असते. काही दुचाकीचालकांना मानेचा (स्पोन्डेलिसीसचा) त्रास वाढलेला आहे. असे प्रकार घडत असतानाही वाहतूक पोलिसांतर्फे केवळ दुचाकीचालकांना टार्गेट करून चलन फाडण्य़ाचे प्रकार सुरू आहेत.याबाबत पोलिस कर्मचाऱयावरही उच्चधिकाऱयाच्या आदेशानुसार प्रतिदिवस चलन फाडण्याचे टांगती तलवार असल्यामुळेही रस्त्यावरील वाहतूक पोलिसांचा नाईलाज असतो. महामार्गावर सुसाट वेगाने वाहने हाकणाऱयावर कोणतीच कारवाई नाही, बाजारहटी, दवाखान्यात व औषधे नेण्यासाठी ओलेल्या दुचाकीचालकांवर कारवाईच्यारूपाने दंडाचा भुर्दड सोसावा लागत आहे. सरकारने फोंडावासियांना आधी सुरक्षित रस्ते द्यावे त्यानंतर वाहतूक पोलिसांना चलन फाडण्यासाठी तैनात करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
याप्रकरणी वाहतूक पोलीस निरीक्षक वेळीप यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सदर प्रकार मुद्दामहून झाला नसून आपल्या सहाय्यक उपनिरीक्षक व कॉन्स्टेबलकडून नकळत घडल्याचे स्पष्ट केले आहे.