बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणी सभेत गो-हत्या बंदी कायदा राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो आता हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आला आहे. सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे स्वागत करत मल्लिकार्जूननगर, समर्थनगर येथे कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांच्या हस्ते गो-पूजन करण्यात आले.
यावेळी पदाधिकाऱयांनी व कार्यकार्त्यांनी उपस्थित राहून गो-पूजन करून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. उपस्थितांनी राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव, सचिन शिवन्नवर, विनायक कोकितकर, अजित जाधव, उमेश बागेवाडी, संतोष कणेरी, राजू खाडे, राकेश मठपती, राहुल काकतीकर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.