बेळगाव : माळमारूती स्पोर्ट्स क्लब आयोजित सिगन चषक निमंत्रितांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद अकादमीने एमसीसी सी मच्छे संघाचा 4 गडय़ानी तर ग्लॅडिएटर संघाने एमसीसी ए वन संघाचा 53 धावांनी पराभव केला. आर्यन उपाध्ये (आनंद), केतज कोल्हापुरे (ग्लॅडिएटर) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर सोमवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एमसीसी सी संघाने 15.1 षटकात सर्व बाद 77 धावा केल्या. त्यात गौस हाजीने 22, युसूफ पठाणने 15 धावा केल्या. आनंदतर्फे आनंद कुंभारने 14 धावात 3 तर आर्यन उपाध्येने 4 धावात दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 15.3 षटकात 6 बाद 78 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. त्यात आर्यन उपाध्येने 2 षटकार, 1 चौकारासह 24, किरणने 17 धावा केल्या. एमसीसीतर्फे गौसपीर हाजीने 10 धावात 4 तर सुनील लमाणीने 1 गडी बाद केला. दुसऱया सामन्यात ग्लॅडिएटर्स संघाने 20 षटकात 7 बाद 150 धावा केल्या. त्यात केतज कोल्हापुरेने 2 षटकार, 6 चौकारासह 63 तर अरिहंत अम्मनगीने 34 धावा केल्या. एमसीसी ए वनतर्फे फिर्दोसने 28 धावात 2 तर मधुने 10 धावात दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एमसीसी ए वन संघाचा डाव 9 षटकात 97 धावात आटोपला. त्यात फिर्दोसने 31 तर अभिषेक देसाईने 12 धावा केल्या. ग्लॅडिएटरतर्फे केतज कोल्हापुरेने 15 धावात 4 तर कय्युमने 12 धावात 2 गडी बाद केले.