प्रतिनिधी/ बेळगाव
शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजी यांनी दिलेल्या आदेशानुसार शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुक्रवार दि. 1 जूनपासून हिंदवी स्वातंत्र्य सप्ताह साजरा करायचा आहे. यामध्ये आठवडाभर धारकऱयाने भगवा फेटा किंवा पांढरी टोपी परिधान करायची आहे. आपल्या घरावर भगवा ध्वज लावून हा सप्ताह साजरा करावा, असे आवाहन शिवप्रति÷ानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी केले आहे.
रायगडावर साकारण्यात येणाऱया सुवर्ण सिंहासनाच्या पहाऱयासाठी खडा पहारा ही योजना आखण्यात आली असून, या सप्ताहामध्ये नाव नोंदणीसाठी प्रयत्न करावयाचा आहे. गुरुवार दि. 4 रोजी प्रत्येक धारकऱयाने घरी शिवप्रभुंचे पूजन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करावयाचा आहे. शुक्रवार दि. 5 पासून नित्य शिवभारत पारायण सुरू करायचे आहे. यासाठी सायंकाळी श्री राजा शिवछत्रपती या ग्रंथाचे पारायण 10 ते 20 धारकऱयांना घेऊन रोज 30 ते 40 मिनिटे करायचे आहे. सर्व कार्यक्रम करताना लॉकडाऊनचे नियम व काळजी घेणे गरजेचे असल्याचे शिवप्रति÷ानतर्फे कळविण्यात आले आहे.
भिडे गुरूजींवरील गुन्हा मागे घ्या
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भगवे ध्वज उपलब्ध करण्यासाठी भिडे गुरूजी इचलकरंजीला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर प्रशासनाने जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला आहे. भिडे गुरूजींवरील हा गुन्हा तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी शिवप्रति÷ान बेळगावतर्फे करण्यात आली आहे.