सिमेंट काँक्रिटच्या इमारतींमध्ये उकाडय़ाचा त्रास अधिकच जाणवतो, असा अनुभव आहे. पूर्वीच्या रद्दा किंवा मातीच्या घरांमध्ये तापमानाचा समतोल बऱयापैकी साधला जात असे. पण सिमेंटच्या इमारतींमध्ये उन्हाळय़ात अधिक उकडते तर हिवाळय़ात अधिक थंडी वाजते, असे दिसून येते. तथापि, सिमेंटच्या इमारतींना आता पर्याय नाही. त्यामुळे संशोधकांनी या इमारतींचे तापमान कसे कमी राखता येईल, याविषयी अनेक संशोधने केली आहेत. बेरियम सल्फेट या रासायनिक पदार्थापासून विशेष प्रकारच्या रंगाची निर्मिती करण्यात आली असून तो घराला आतून व बाहेरून लावल्यास तापमान 5 डिग्री सेल्सियस इतके कमी होते, असे दिसून आले आहे. अर्थात बेरियम सल्फेट ज्या खनिजापासून मिळते त्याचे उत्खनन करणे ही जटील प्रक्रिया असल्याने सध्या हा रंग अधिक महाग आहे.
संशोधकांचे त्यावर म्हणणे असे आहे, की ज्या जनावरांचा रंग पांढरा असतो त्यांच्या केसांपासूनही बेरियम सल्फेट बनविता येऊ शकेल. या प्राण्यांची कातडी किंवा केस पांढरे का असतात, यावर अधिक संशोधन केल्यास बेरियम सल्फेट बनविण्याचे सोपे तंत्रज्ञान विकसित होऊ शकते, असेही मानले जाते.