जिंद / वृत्तसंस्था
साडेचारशे वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या काळात मुस्लीम धर्म स्वीकारलेल्यांपैकी 40 कुटुंबांनी तीन दिवसांपूर्वी आपल्या मूळच्या हिंदूधर्मात प्रवेश केला आहे. ही घटना हरियाणातील जिंद जिल्हय़ात घडली आहे. औरंगजेबाच्या काळात धार्मिक अत्याचारांपासून सुटका करून घेण्यासाठी आमच्या पूर्वजांना हिंदू धर्म सोडावा लागला होता. पण आता पुन्हा हिंदू झाल्याने आम्हाला समाधान वाटते, असे यांपैकी अनेकांनी स्पष्ट केले. एप्रिल 2018 मध्येही 35 कुटुंबांनी अशाच प्रकारे हिंदू धर्मात प्रवेश केला होता. हरियाणातील मुस्लीम समाजातील अनेकांना हिंदू होण्याची इच्छा आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने ते हिंदू धर्मात येत आहेत. प्रत्यक्ष हिंदू होण्यापूर्वीपासूनच अनेकांनी हिंदू सण साजरे करण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती