ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपूरमध्ये संसर्ग वाढीचा आलेख वाढताच असून आज दिवसभरात 3,630 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 60 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 29 हजार 668 वर पोहोचली आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 2,928 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 1 लाख 84 हजार 537 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
- 5,158 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी
सद्य स्थितीत नागपूरमध्ये 39,973 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 5,158 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.