स्मार्टफोन निर्मिती, वाहन उद्योगासह अन्य कंपन्यांच्या चिंतेत पडतेय भर- महसूल 6 कोटींवर
नवी दिल्ली
‘चिप’चा पुरवठा नियमितपणे न होऊ शकल्याने मॅक आणि आयपॅडची विक्री कमी झाली असल्याची माहिती ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘एप्रिल ते जून 2021 च्या तिमाही दरम्यान कंपनीचा महसूल हा जवळपास 6 लाख कोटींवर पोहचला आहे.’ वर्षाच्या आधारे पाहता महसूलात 36 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती आहे. मॅकमधून जवळपास 61 हजार कोटी रुपयांचा आणि आयपॅडच्या माध्यमातून 54 हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. जबदरस्त कमाई करणाऱया ऍपल कंपनीला मात्र सप्टेंबर तिमाहीसाठी चिपच्या कमतरतेमुळे काळजीत पाडले असल्याची माहिती आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे ऍपल कॉम्प्युटर चिप किंवा सेमिकंडक्टरशी संबंधीत पुरवठाही बाधित झाला असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीमुळे सप्टेंबर तिमाहीत आयफोन आणि आयपॅडच्या विप्रीला मोठा फटका बसणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
ऍपलसह अन्य कंपन्या चिंतेत…
उद्योग क्षेत्रात फक्त टेक्नॉलॉजी क्षेत्रच चिपच्या कमतरतेमुळे प्रभावीत आहे, असे नाही तर वाहन निर्मिती कंपन्या, मोबाईल निर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या यासह अन्य कंपन्याही या लहानशा चिपच्या कमतरतेमुळे काळजीत आहेत. हे जगाच्या बाजारपेठेतील स्थितीमुळे पहावयास मिळत आहे. या स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सेमिकंडक्टरचा प्रथम वापर?
इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ अलेसेंड्रो वोल्टा यांनी 1782 मध्ये पहिल्यांदा ‘सेमिकंडक्टिंग’या शब्दाचा वापर केला होता. परंतु अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ मायकल फॅराडे हे 1833 मध्ये सेमिकंडक्टरचे सूक्ष्म निरीक्षण करणारे पहिले व्यक्ती बनले होते.