प्रतिनिधी/ चिपळूण
चार महिन्यांपूर्वी ज्या अनधिकृत गुटखा विपेत्यांवर कारवाई झाली त्याच विक्रेत्यांनी पुन्हा गुटखा विकण्यास सुरूवात केली आहे. शहरासह सावर्डेत मोठय़ाप्रमाणात माल येत असून याकडे अन्न, औषध प्रशासन व पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
स्पर्धेच्या युगातील तरूण पिढी व्यसनाधिन होताना दिसत आहे. त्यामुळे आपले उत्पन्न कमी न करता त्यांचे व्यसनाचे प्रमाण थोडे कमी करण्याचा शासन कायम प्रयत्न करताना दिसत आहे. त्यानुसार गुटखा विक्रीवर पूर्णपणे बंदी असून सिगारेट व अन्य अंमली पदार्थ विक्रीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र तरीही खुलेआम बंदी असलेले व नियम, अटी घालून दिलेले सर्वच अंमली पदार्थ विकले जात असल्याचे सहज दिसून येते.
यातूनच चार महिन्यांपूर्वी शहरातील रंगोबा साबळे रोड व सावर्डे बाजारपेठेत पोलिसांनी छापा मारून लाखो रूपयांचा गुटखा साठा जप्त करत याप्रकरणी अनेकांना अटक केली होती. यात अनेकांना काही दिवस जेलची हवाही खावी लागली. मात्र असे असले तरी कारवाई झाली तेव्हा व आजही गुटखा विक्री बंद झालेली नाही. सर्वच टपऱया व लहान-मोठय़ा दुकांनामधून गुटख्याची विक्री होत असून कारवाईनंतर दर मात्र वाढले आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी ज्यांच्यावर कारवाई झाली आहे त्यांनी पूर्वीपेक्षा अधिक जोमाने हा व्यवसाय वाढवला आहे. त्यामुळे एकवेळची कारवाई जणू त्यांच्या पथ्यावरच पडली आहे.
शाळा-महाविद्यालयाजवळील दुकानांत तंबाखू, सिगारेट, गुटख्याची विक्री
शाळा-महाविद्यालयाजवळील अनेक दुकानांत तंबाखू, सिगारेट, गुटख्याची विक्री केली बिनधास्तपणे केली जात असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक शहरातील शाळा-महाविद्यालयाजवळील दुकानांत नियमानुसार तंबाखू, सिगारेट यासारख्या वस्तू विकण्यास बंदी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून याची बिनधास्तपणे विक्री केली जात आहे. गुटख्याचीही चोरून विक्री सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांनी धडक मोहीम राबवून कडक कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिकांतून होत आहे.
रत्गागिरीसह रायगड, सिंधुदुर्गला पुरवठा
हा गुटखा कर्नाटक, गोवा राज्यातून येथे येत असून येथील मुख्य एजंट तो रत्नागिरी जिल्हय़ासह रायगड व सिंधुदुर्ग जिल्हय़ाला पुरवत आहेत. त्यामुळे या गुटख्याची मध्यरात्री व पहाटे आयशर टेम्पो, तर कधी पिकअप रिक्षातून वाहतूक होत असल्याचे चर्चा नागरिकांमून सुरू आहे.
गांजा विक्रीही मोठय़ाप्रमाणात
सध्या पोलिसांनी धूमस्टाईलने दुचाकी चालवणाऱयांवर कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई स्वागतार्ह आहेच. मात्र त्याचबरोबर सायंकाळी उक्ताड बायपास, गांधारेश्वर, गोवळकोट आदी भागात गांजा ओढत बसणाऱया तरूणांवरही कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. गांजा विक्रीचे पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेले पाग हे मुख्य केंद्र असल्याची माहितीही पुढे येत आहे. त्यामुळे या केंद्रावरही लक्ष पेंद्रित करण्याची मागणी होत आहे. सध्या काही टपऱयांवरही कोडने गांजा मिळत असल्याचे वृत्त आहे.
…तर कारवाई करणार- पोळ
याबाबत पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याशी संपर्क साधला असता गुटखा विक्री करणाऱयांवर आम्ही वेळोवेळी कारवाई केली आहे. मात्र तरीही कोणी व्यवसाय करीत असेल तर अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.