ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमध्ये 1961 नंतर यंदा सर्वाधिक पासून झाला असून, अनेक शहरे पुराने वेढली आहेत. या महापुरात आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 141 नागरिक बेपत्ता आहेत. चीनच्या आपत्कालीन मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
सततच्या पावसामुळे चीनमधील 433 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महापुरात 28 हजार घरांचे नुकसान झाले असून, अनेक गावे पाण्याखाली आहेत. महापुरामुळे चीनचे आतापर्यंत 8 अब्ज डॉलरहून अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. पुढील आठवड्यातही चीनमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
चीनमधील आणि आशियातील सर्वात लांब यांगत्से नदीला पूर आला आहे. यांगत्से नदी हुबेई प्रांतातूनही वाहते. वुहान याच प्रांताची राजधानी आहे. येथूनच कोरोनाची सुरुवात झाली होती.