ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमध्ये 3 ते 17 वयोगटातील मुलांनाही सिनोवॅक बायोटेकची कोरोना लस देण्यात येणार आहे. सध्या चीनमध्ये 18 वर्षापुढील सर्वांना कोरोना लस देण्यात येत आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार, सिनोवॅक लसीच्या लहान मुलांमधील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचण्यांमध्ये पहिला डोस घेतल्यानंतर लहान मुलांमध्ये एका आठवडय़ात 10 पट तर 15 दिवसात 20 पट अँटीबॉडीज तयार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चीन सरकारने सिनोवॅकच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. 3 वर्षापुढील मुलांना लस देणारा चीन हा जगातला पहिला देश ठरणार आहे. मात्र, हे लसीकरण नेमकं केव्हापासून सुरू होणार याची माहिती अद्याप समोर आली नाही.