क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
उपान्त्य लढतीत म्हापसाच्या इस्टिलो लिझंड संघाचा 4 विकेट्सनी पराभव करून काले इलेव्हन संघाने चोपडे स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या अखिल गोवा स्तरावरील पंचायन आणि नगरपालिका टी-20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
या स्पर्धेचे आयोजन चोपडे मैदानावर करण्यात येत आहे. या लढतीत इस्टिलो लिझंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 18 षटकात 8 बाद 116 धावा केल्या. त्यांच्या भगवान लांजेकरने 34, व्यंकटेश वेर्लेकरने 27 तर आशिष हिर्लोस्करने 11 धावा केल्या. काले इलेव्हनच्या बागेश रेकडो, वासू खुटकर, प्रणाम देसाई व नागेश पवारने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
उत्तरादाखल, काले इलेव्हनने 16.3 षटकात 6 बाद 119 धावा करून विजय संपादन केला. त्यांच्या तेज्योत बोरकरने 33, प्रणाम देसाईने 22 तर रणजीत खुटकर व नूर अहमदने प्रत्येकी 12 धावा केल्या. इस्टिलो लिझंडच्या वर्धन मिस्कीनने2 तर शुभम नाईक, शुभम झा व मोईद्दिन नारंगीने प्रत्येकी एक गडी बाद केला. काले इलेव्हनच्या प्रणाम देसाईला सामनावीराचा पुरस्कार प्राप्त झाला.