वृत्तसंस्था / मुंबई :
चालू आठवडय़ात कच्च्या तेलाच्या किमतीत ऐतिहासिक घसरण नोंदवण्यात आली होती. यामुळे बाजारात मोठय़ा विविध क्षेत्रांतील समभाग कोसळले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला होता. तर बुधवारी फेसबुक आणि जिओ यांच्यातील व्यवहारामुळे शेअर बाजाराने गमावलेली तेजी पुन्हा परतल्याने सेन्सेक्स व निफ्टीत उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे. तेच वातावरण गुरुवारी चौथ्या दिवशीच्या सत्रातही कायम राहिले होते.
दिवसभरातील कामगिरीत माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्रातील समभागात तेजीची उसळी पहावयास मिळाली होती. या कामगिरीमुळे दिवसअखेर समभाग 483.53 अंकांनी वधारुन निर्देशांक 31,863.08 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीने 126.60 अंकानी वधारुन निर्देशांकांने 9,313.90 इतका टप्पा गाठला होता. सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळण्याच्या संकेतामुळे गुंतवणूकारांमध्ये गुरुवारी समभाग खरेदीत मोठा उत्साह राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये कोटक बँकेचे समभाग सर्वाधिक फायद्यात राहिले असून यांनी तब्बल 8 टक्क्मयांची तेजी गाठली होती. तर सोबत टीसीएस, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक आणि ओएनजीसी यांचे समभागही तेजीत होते. दुसरीकडे टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग घसरल्याचे पहावयास मिळाले आहे.
देशातील बाजारासोबत हाँगकाँग, टोकीओ आणि सोल या बाजारांमध्येही तेजीचा माहोल राहिला होता. तर शांघायचा शेअर बाजार नुकसानीत राहिला होता. तरी सरकार विविध अर्थ सहाय्य देण्याच्या तयारीत असल्याने गुंतवणूकदार समभाग खरेदीकडे वळले असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.