ऑनलाईन टीम / तरुण भारत
नक्षवादी भागात संरक्षण दले आणि नक्षलवादी यांच्यातील संघर्ष नवा नाही. गेली बरीच वर्षे हा संघर्ष सुरु आहे. याच पार्श्वभुमीवर छत्तीसगडच्या दंतेवाडा-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलविरोधी अभियानात उतरलेल्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. हा गोळीबार 14 रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास जवान गोर्ली आणि मुथेली गावादरम्यानच्या जंगलात पोहोचले असता घातात आलेल्या माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला असता यावेळी नक्षलवादी जंगलाचा फायदा घेत पळून गेले.
त्यांचा शोध घेत असताना दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. ज्यामध्ये एक पेडारस एलओएस कमांडर आणि डीव्हीसी सुरक्षा दलाच्या सदस्याच्या समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा अनेक घटनांमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.
काटेकल्याण पोलिस ठाण्याच्या जियाकोर्था, गोर्ली, मुथेली आणि दानिकोर्था भागातील जंगलात मोठ्या संख्येने माओवादी जमले होते. मंगळवारी सकाळी दंतेवाडा डीआरजी, सुकमा डीआरजी, सीआरपीएफ २३० वी बटालियन आणि छत्तीसगड सशस्त्र दलाच्या संयुक्त पथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.