ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात मागील 24 तासात 2 लाख 85 हजार 593 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 6822 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 कोटी 8 लाख 06 हजार 961 वर पोहचली आहे. मृतांचा एकूण आकडा 7 लाख 47 हजार 258 एवढा आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
2.08 कोटी बाधितांपैकी 1 कोटी 37 लाख 06 हजार 685 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 63 लाख 53 हजार 018 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 64 हजार 608 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 53 लाख 60 हजार 302 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 28 लाख 12 हजार 603 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 69 हजार 731 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 31 लाख 70 हजार 474 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 23 लाख 09 हजार 477 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 4 हजार 263 जणांचा मृत्यू झाला आहे.