ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 2 कोटी 23 लाख 09 हजार 795 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 50 लाख 53 हजार 617 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मंगळवारी जगभरात 2 लाख 53 हजार 842 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 6312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 7 लाख 84 हजार 380 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 64 लाख 71 हजार 798 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 62 हजार 024 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 56 लाख 55 हजार 974 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 30 लाख 11 हजार 234 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 75 हजार 074 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 34 लाख 11 हजार 872 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 25 लाख 54 हजार 179 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 10 हजार 019 जणांचा मृत्यू झाला आहे.