न वर, ना वरात : अमेरिका-इटलीतही हाच ट्रेंड
विवाहसोहळय़ात वर, वरात, बँडबाजा, विधी नाहीत केवळ स्वतःच्या पसंतीचा पोशाख आणि दागिने परिधान केलेली वधू आणि तिच्या मैत्रिणी तसेच कुटुंबीय अन् त्यांच्यासाठी पंचपक्वानं असे चित्र आता जपानमध्ये दिसून येत आहे. या विवाहात वधू स्वतःसोबतच विवाह करत आहे.
भारतात हा विचार करणे अवघड असले तरीही जपानमध्ये मुली मोठय़ा आनंदाने सोलो मॅरेज करत आहेत. जपानी मुली स्वतःच्या पसंतीचा पोशाख घालतात, अंगठी तयार करवून घेतात आणि स्वतःसोबत राहण्याचे वचन देतात. त्यांना स्वतःच्या जीवनात कुठल्याच जोडीदाराची गरज नाही. त्यांनी जीवनभर एकटय़ाने राहण्याची शपथ घेतलेली आहे. 2 लाख रुपयांचा खर्च येणारे सोलो वेडिंग कंपन्यांमार्फत पार पाडले जातेय.
जपातमध्ये बहुतांश मुली सोलो वेडिंगचा पर्याय निवडत आहेत. अन्य कुणासोबत जीवन घालवू इच्छित नसल्या तरीही वधूप्रमाणे सजण्याचे स्वप्न त्या पूर्ण करत आहेत. तेथील सेरेका ट्रव्हल नावाच्या कंपनीने मुलींसाठी उत्तम सोलो वेडिंग पॅकेज जारी केले आहे. यात दोन दिवसांसाठी वधू हॉटेलमध्ये राहते. तिचा ड्रेस तयार करविला जातो, बँकेट हॉलला डिझाइन करण्यात येते, वधूचा मेकअप करण्यात येतो, त्यानंतर पूर्ण फोटोशूट करविण्यात येते, विवाहाचा अल्बमही तयार करून दिला जातो. पाहुण्यांना आमंत्रित करून जेवण वाढविले जाते. सोलो वेडिंगसाठी बजेट देखील महिलांच्या पसंतीनुसार ठरते. जितका आलिशान विवाहसोहळा तितके मोठे पॅकेज असते. वधूंच्याही वेगवेगळय़ा प्रकारच्या मागण्या असतात. कुणाला तीन लेयरचा वेडिंग केक हवा असतो. तर काही महिला स्वतःच्या वेडिंग फोटोशूटध्ये सुंदर तरुण मुलांनाही प्रेमममध्ये सामील करवित असतात.जपानच्या इव्हेंट कंपनीनुसार सर्वात स्वस्त सोलो वेडिंग 3 लाख येनमध्ये आयोजित होऊ शकतो.