वार्ताहर/ जमखंडी
जमखंडी मुख्य पोस्ट कार्यालयासमोर अखिल भारत ग्रामीण पोस्टल कर्मचारी नोकर संघाने विविध मागण्यांसाठी एक दिवसाचा संप केला व निदर्शने केली.
जीडीएस कर्मचाऱयांना नोकरीवर कायम करावे, कुटुंबातील सदस्यांना योग्य सुविधा व गणवेश पुरविण्यात यावा, महागाई भत्ता द्यावा आदी मागण्या मांडण्यात आल्या. या संपात एस. बी. चलवादी, व्ही. एम. काळगी, एस. डी. निलनायक, एस. व्ही. कुलकर्णी, जी. के. देशपांडे, एस. व्ही. कडी, एन. ए. इनामदार, ए. जी. रेड्डारेड्डी, मुत्तू ढवळेश्वर, श्रीशैल हजारी, सोमाप्पा बसन्नवर, एम. एस. फरलंकी आदींनी भाग घेतला.