ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर :
जम्मू काश्मीरमध्ये आज पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी सकाळी 8.19 मिनिटांनी जम्मू काश्मीरमधील गुलमर्गमध्ये हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
याआधीही मंगळवारी देखील जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर 11 सप्टेंबर रोजी देखील भारत पाकिस्तानच्या सीमेवर दुपारी 1 वाजून 53 मिनिटांनी भूकंप झाला होता. हा भूकंप जमिनीखाली 10 किलो मीटर खोल अंतरावर झाला होता.