राजकोट : आगामी सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 स्पर्धेत स्पीडस्टार जयदेव उनादकट सौराष्ट्र संघाचे नेतृत्व भूषवणार आहे. सौराष्ट्र विद्यमान रणजी विजेता असून शुक्रवारी त्यांच्या संघव्यवस्थापनाने ऑनलाईन बैठकीनंतर संघनिवडीची घोषणा केली. प्रेरक मंकड, चिराग जानी, डावखुरा फलंदाज अर्पित वासवदा, यष्टीरक्षक-फलंदाज हार्विक देसाई यांचा संघात प्रामुख्याने समावेश आहे. गोलंदाजीत उनादकटला डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकरिया व डावखुरा मंदगती गोलंदाज धर्मेंद्रसिंह जडेजा साथ देतील. ही स्पर्धा 10 जानेवारीपासून खेळवली जाणार असून सौराष्ट्राचा सेनादल, विदर्भ, गोवा, मध्य प्रदेश व राजस्थानसह ड गटात समावेश आहे.
Previous Articleसरकारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत टॅब
Next Article स्पोर्टिंग प्लॅनेट संघाकडे फँको चषक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.