वृत्तसंस्था/ कोलॉन
जर्मनीत रविवारी झालेल्या एटीपी टूरवरील कोलॉन खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या टॉप सीडेड ऍलेक्झांडर व्हेरेव्हने एकेरीचे जेतेपद मिळविताना ऍलीसिमेचा पराभव केला.
जर्मनीच्या सातव्या मानांकित ऍलेक्झांडर व्हेरेव्हने रविवारी येथे झालेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात तृतीय मानांकित फेलिक्स ऑगर ऍलीसिमेचा 6-3, 6-3 असा पराभव केला. मायदेशात व्हेरेव्हने एटीपी टूरवरील तिसरे विजेतेपद मिळविले. दरम्यान ऍलीसिमेला अलिकडच्या कालावधीत सहा विविध स्पर्धामध्ये अंतिम फेरीत हार पत्करावी लागली आहे. 20 वर्षीय ऍलीसिमेने स्पेनच्या ऍग्युटचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या व्हेरेव्हने उपविजेतेपद मिळविले होते.