आज कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्मयता : 24 तास पाणीपुरवठा योजनेचा होणार विस्तार
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील 48 वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. याकरिता लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रातून शहरात पाणी आणण्यासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीतून जलवाहिन्या घालण्यात येणार आहेत. सदर जलवाहिन्या घालण्यासाठी कॅन्टोन्मेंटकडे रस्ता खोदाईकरिता परवानगीची मागणी करण्यात आली आहे. सदर विषय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण बैठक मंगळवार दि. 20 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी रस्ता खोदाईच्या परवानगीच्या मुद्दय़ावर चर्चा होण्याची शक्मयता आहे. महापालिकेच्या उर्वरित वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. सदर काम एल ऍण्ड टी कंपनीला देण्यात आले आहे. सदर कामाकरिता कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले असून लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रामधून शहरातील विविध ठिकाणी असलेल्या जलकुंभात पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनी घालणे गरजेचे आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील रामघाट रोड, थिमय्या रोड, स्वतंत्रता मार्गशेजारी सदर जलवाहिनी घालण्यात येणार आहे. त्याबाबतचा आराखडा कंपनीने तयार केला असून हे काम एल ऍण्ड टी करणार आहे. खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती कंपनी करून देणार आहे. जलवाहिनी घालण्याकरिता कॅन्टोन्मेंट बोर्डची परवानगी आवश्यक आहे. सदर परवानगीची मागणी पायाभूत सुविधा खात्याने कॅन्टोन्मेंटकडे केली आहे. पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरणासाठी परवानगी विचारण्यात आल्याने हा विषय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे.
24 तास पाणी योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्यासाठी मंजुरी देण्याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्मयता आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या पाणी पुरवठय़ाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. 24 तास पाणीपुरवठा योजना केवळ महापालिका हद्दीमध्येच राबविण्यात येणार आहे. या योजनेत कॅन्टोन्मेंट बोर्डचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतही 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्मयता आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत लीजवर देण्यात आलेल्या जागांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. कामगारांच्या वेतनवाढीचा मुद्दा बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंटचे काही कर्मचारी 10 ते 15 वर्षांपासून एकाच पदावर सेवा बजावत आहेत. त्यांना बढती देण्यात आली नाही. कर्नाटक शासनाच्या कायद्यानुसार एकाच ठिकाणी सेवा बजावणाऱया कामगारांच्या वेतनात वाढ केली जाते. त्यानुसार कॅन्टोन्मेंटमध्ये एकाच हुद्यावर काम करणाऱया कामगारांनाही वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतही चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.