मोटार मालक, एजंट असोसिएशनचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
गोव्याकडे जाणाऱया अनमोड रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रामनगरपासून हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्या रस्त्यावर वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे वाहन चालक चोर्लामार्गे गोव्याला जात आहेत. मात्र गोव्याच्या हद्दीमधील केरी या गावाजवळ वाहनांना अडवून या मार्गावरून तुम्ही वाहने आणू नका, अशी तंबी दिली जात आहे. त्यामुळे वाहनचालक अडचणीत आले असून रामनगरजवळील तो रस्ता दुरुस्त करावा व अनमोड मार्ग खुला करावा, अशी मागणी करण्यात आली.
बेळगाव जिल्हा मोटर मालक आणि एजंट असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे ही मागणी करण्यात आली आहे. बेळगाव येथून गोव्याला दररोज शेकडोच्या संख्येने वाहने जात आहेत. मात्र गेल्या चार वर्षांपासून रामनगर जवळील रस्ता खराब झाला आहे. बऱयाचवेळा वाहने अडकून पडत आहेत. तर या रस्त्यामुळे वाहने खराब होत आहेत. त्यामुळे मोठा भुर्दंड बसत आहे.
बेळगाव येथून गोव्याला भाजी तसेच इतर साहित्य जाते. रामनगरजवळ रस्ता खराब झाल्यामुळे खानापूर-चोर्लामार्गे वाहने आम्ही नेत आहे. मात्र गोवा राज्याचे पोलीस अडवून आम्हाला नाहक त्रास देत आहेत. तेंव्हा गोवा सरकारशी संपर्क साधून आम्हाला चोर्लामार्गे वाहतूक करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष ए. ए. पाच्छापुरी, जे. एस. कुडचीकर, स्वरुप कलादगी, एस. ए. जमादार, गौसशेख व टॅक्सी चालक, मालक व एजंट उपस्थित होते.