साधी राहणी अन् निष्कलंक राजकीय जीवन
किरीट परमार यांनी गुजरातमधील महानगर असलेल्या अहमदाबादचे महापौर म्हणून पदभार हाती घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आणि दोनवेळा नगरसेवक राहिलेले किरीट परमार अहमदाबाद या महानगरात झोपडीवजा घरात राहतात. परमार यांना महापौरपद देऊन कुठलाही व्यक्ती मेहनत आणि कामाच्या बळावर मोठय़ा पदांपर्यंत पोहोचू शकतो असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे मानले जात आहे.
अहमदाबादच्या ठक्करबापानगर भागात नवे महापौर किरीट परमार यांचे घर आहे. सर्वसाधारण जीवन जगणारे परमार एका छोटय़ा घरात राहतात, पूर्ण गुजरातमध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा होत आहे. दैनंदिन गरजांकरता वापरल्या जाणाऱया साधनांच्या व्यतिरिक्त त्यांच्या घरात काहीच दिसून येत नाही. त्यांच्या घरात फ्रीज देखील नाही.
परमार दररोज संघाच्या शाखेत जातात. संघाच्या विचारधारेशी जोडले गेलेले परमार यांनी विवाह केलेल नाही. परमार यांनी बुधवारी सकाळीच अहमदाबादचे महापौरपद हाती घेतले आहे.