सहा महिन्यातील सर्वात वेगवान : सरकारकडून आकडेवारी सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील औद्योगिक विकासाचा दर जानेवारी 2020 मध्ये दोन टक्क्यांवर राहिला आहे, हा आकडा मागील सहा महिन्यातील सर्वात समाधानकारक असल्याची माहिती सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीतून देण्यात आली आहे. एक वर्षापूर्वी समान कालावधीमध्ये जानेवारी 2019 रोजी औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) 1.6 टक्क्यांनी वाढ नोंदवली होती. एप्रिल 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत या 10 महिन्याच्या कालावधीत औद्योगिक विकासाचा दर 0.5 टक्क्यांवर राहिला होता. जो मागील वर्षात समान कालावधीत 4.4 टक्क्यांवर राहिला होता.
जानेवारी 2020मध्ये उत्पादन क्षेत्रातील विकासदर 1.5 टक्क्यांवर राहिला आहे. जो एक वर्षातील समान कालावधीत 1.3 टक्के राहिला होता. आयआयपीमध्ये उत्पादन क्षेत्राचे योगदान 77.63 टक्के राहिले होते. खाण क्षेत्राचा विकासदर याच काळात 3.8 टक्क्यांनी वाढून 4.4 टक्क्यांवर स्थिरावला होता. वीज क्षेत्रातील विकासदर 3.1 टक्क्यांवर राहिला होता. जो एक वर्ष अगोदर समान कालावधीत 0.9 टक्के होता. अशी माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय यांच्याकडून(एनएसओ) सादर केलेल्या आकडेवारीतून देण्यात आली आहे.
चालू व्यापारी वर्षातील प्रत्येक
महिन्यातील विकास दर
महिना विकासदर
- जानेवारी 2020. 2…
- डिसेंबर 2019… 0.07…
- नोव्हेंबर 2019.. 1.82…
- ऑक्टोबर 2019. (-)6.63…
- सप्टेंबर 2019…. (-)4.58…
- ऑगस्ट 2019…. (-)1.41…
- जुलै 2019…….. 4.85…
- जून 2019……… 1.26…
- मे 2019……….. 4.48…
- एप्रिल 2019 3.18…