गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल
उचगाव / वार्ताहर
पत्नीला माहेरी का ठेवून घेतले या कारणावरून काठीने सासू बीबी सुलतान शेख व पत्नी शबाना हुसेन शेख( दोघी रा. उचगाव,सावंत गल्ली) यांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी हुसेन फक्रुद्दीन शेख( मुळगाव देहूरोड पुणे सध्या राहणार उचगाव) याच्याविरुद्ध गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद दौलत उर्फ बीबी सुलतान शेख (वय ५० रा. सावंत गल्ली उचगाव ता करवीर यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी संशयित हुसेन शेख याला दारूचे व्यसन असल्याने पत्नी शबाना हिला व तिच्या मुलींना शिवीगाळ करून पुण्यातील घरामध्ये मारहाण करत होता. त्यामुळे २००६ पासून ती उंचगाव येथे आपल्या दोन मुलीसह स्वतंत्र राहत होती. मंगळवारी हुसेन हा उचगाव येथील सासु बेबी शेख यांच्या घरी जाऊन सासूला व पत्नीला शिवीगाळ करून लाकडी बॅटनपट्टीने मारहाण करून गंभीर जखमी केले.याबाबत हुसेन शेख याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस हवालदार राजू नाईक करत आहे.